सोलापूर / आशा रणखांबे : महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागातिल आपापल्या कामांचा व्याप सांभाळीत जे साहित्य सेवा करतात त्यांचा राजस्व शब्दलळा मंच या समुहाचा ‘शब्दधारा’ प्रातिनिधीक कविता संग्रह दिनकर ठाकरे यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रकाश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजस्व शब्दलळा मंच, महाराष्ट्र राज्याचे समुह प्रशासक राजेश चौरपगार, अमरावती यानी केले व शब्दलळा मंच स्थापनेचा उद्देश ही आपल्या प्रास्तविकात नमुद केले.
हेही वाचा ! प्रा. एन. डी. पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द
या कार्यक्रमाचे प्रमुख प्राहुणे म्हणून बार्शीचे ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी, नायब तहसीलदार श्रीकांत कवळे, कोकण भवन आणि पुस्तकाचे प्रकाशक श्यामभाऊ चौकुडे होते. प्रमुख अतिथी विनोद अढाऊ यानी ‘शब्दधारा’ या पुस्तकाचे अभ्यासपुर्ण विश्लेशन केले आणि कौतुक ही केले.
यावेळी बोलतांना अढाऊ म्हणाले, ‘शब्दांच्या धारेतच वंचितांचे दु: ख दुर करण्याची धार असते. त्यासाठी साहित्यिकांची उक्ती आणि कृती एक असेल तरच शब्दातील धारेला किंमत येईल अन्यथा नाही.
किशोर जराड यानी ‘ साहित्य आणि महसुल खात्यात साहित्य निर्मिति होणे ही महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसुल परिवारात लेखन करणारा मोठा वर्ग आहे. आणि तो वर्ग ‘राजस्व शब्दलळा मंच’ च्या व्यासपिठावर येणे. हिच गोष्ट अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना किशोर जराड यानी केले तर ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी यांनी ‘शब्दधारा’ हा कविता संग्रह सामाजिक भान ठेवणारा, वंचिताला न्याय देणारा असल्याने तो बहुचर्चित राहील असे स्पष्ठ केले.
यावेळी स्वरांजली ग्राफिक्स लिमिटेड, अमरावतीचे संचालक श्यामराव चौकुडे यानी ‘ई’ बुक काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश केले तर अक्षय खानापुरकर यानी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता विजय धर्मसारे, रोजी कापसे, प्रियंका येईलवाड यांनी परिश्रम घेतले.
नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !
राजस्व शब्दलळा मंच, अमरावती यांच्या वतीने प्रकाशीत केलेल्या या कविता संग्रहाचे संपादन राजेश चौरपगार, श्रीकांत कवळे, अविनाश पोटदुखे, प्रविणकुमार ढोले, किशोर जराड आणि डॉ.वैशाली वाघमोडे- शेंडगे यानी केले. शब्बीर मुलाणी यांची विस्तृत प्रस्तावना या कविता संग्रहास लाभली आहे.