Sunday, December 22, 2024
Homeराज्यAshadhi Wari : संत मुक्ताईची पालखी बुलढाण्यात दाखल

Ashadhi Wari : संत मुक्ताईची पालखी बुलढाण्यात दाखल

Ashadhi Wari : आषाढी वारी निमित्त राज्यभरातल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत. राज्यभर मानाचे स्थान असलेल्या मुक्ताईनगर, जळगाव येथील संत मुक्ताईंची पालखी १८ जून रोजी दुपारी १ वाजता कोथळी येथील संत समाधिस्थळा पासून निघाली आहे. संत मुक्ताईची पालखीचे यावर्षीचे ३५९ वे वर्ष आहे.

संत मुक्ताईची पालखी बरोबर खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून हजारो वारकरी तब्बल ६०० किलोमीटरचा प्रवास करून १४ जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतील. (Ashadhi Wari)

संत मुक्ताईची पालखी राजूरचा घाट चढून बुलढाणा (BULDHANA) शहरात दाखल झाली असून ज्ञानोबा तुकारामच्या गजराने बुलढाण्याचा परिसर दुमदुमून गेला. आज बुलढाणा शहरात जुन्या गावातील हनुमान मंदिरात मुक्कामी आहे.

ह.भ. प. रवींद्र महाराज हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिला व पुरुष वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत शहरात आगमन प्रसंगी बुलढाणेकरांनी मोठ्या उत्साहात मुक्ताईच्या पालखीचे रांगोळ्या काढून स्वागत केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय