Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 26 निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी महत्त्वाचा म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे (Velhe) तालुक्याला आता राजगड (Rajgad) म्हणून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ (Rajgad) करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांनी या संदर्भात मागण्या केल्या होत्या. स्थानिक लोकभावना आणि वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केलेले ठराव लक्षात घेऊन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदींनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.


हे ही वाचा :
भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की
ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…
ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय
जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा