Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : वाहनाचा नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करण्याचे आवाहन

Pune : वाहनाचा नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करण्याचे आवाहन

पुणे, दि. २२ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रात नागरिकांना व वाहनधारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घरबसल्या व सहज उपलब्ध होण्याकरीता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Pune)

या सुविधेअंतर्गत नागरिकांना एमएच-१४ मधील सध्या सुरू असणाऱ्या मालिकेमधील उपलब्ध क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता योणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या पसंती क्रमांकासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तसेच ऑनलाईन पद्धतीने क्रमांक आरक्षित करतांना निर्धारित शासकीय शुल्कदेखील तात्काळ ऑनलाईन अदा करता येणार आहे. ही सुविधा शासनाच्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने पसंती क्रमांक आरक्षित केल्यानंतर त्याची प्रत संबंधित वाहन वितरक यांना नोंदणी क्रमांक जारी करण्याकरीता देण्यात यावी.

नवीन वाहन मालिका सुरू करतावेळीची कार्यपद्धती या पूर्वीप्रमाणेच राहील. एका पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास कार्यालयात लिलाव करून पसंती क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे. (Pune)

whatsapp link
google news gif

हेही वाचा

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय