कळवण (सुशिल कुवर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अखेर टीईटी परीक्षेला (TET Exam) मुहूर्त लागला असून येत्या ऑक्टोबर महिन्यात ही परीक्षा होणार आहे.
मागील दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा झालेली नव्हती त्यामुळे टीईटी देण्यासाठी पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ही टीईटी परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असून अर्ज करण्याची करण्याची प्रक्रिया (Application Process) ०३ ऑगस्ट पासून सुरू होऊन २५ ऑगस्ट ११:५९ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) टीईटी परीक्षा होत असून इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य आहे.
या परीक्षेची सविस्तर माहिती परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे Commissioner Tukaram Supe) यांनी दिली.