Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अमित शहा हे भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेत आल्यास एससी/एसटी आरक्षण संपुष्टात आणेल असे बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून अमित शहांवर जोरदार टीका केली जात आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर देशभरात राजकीय नेत्यांच्या सभा सुरू आहे. टीका-टीपण्णीला देखील ऊत आला असताना भाजप पुन्हा सत्तेत आल्यास भाजप भारतीय संविधान बदलेल अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच खूद्द भाजप नेत्यांनी देखील आपल्या भाषणात संविधान बदलण्यासाठी ४०० पार हवेत असे विधान केले होते.
संविधान बदलाच्या मुद्यावरून देशभरातील राजकीय वातावरण तापले असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शहा एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत बोलत असल्याचे दिसत आहे. मात्र आता हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरक्षण संपवण्याबाबतचा व्हिडिओ हा बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. या व्हिडिओबाबत रविवारी (२८ एप्रिल) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
मूळ व्हिडिओमध्ये काय म्हणाले होते Amit Shah ?
मूळ व्हिडिओमध्ये, अमित शाह तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास मुस्लिम आरक्षण संपवण्याविषयी बोलताना दिसत आहे. हाच व्हिडिओ एडिट करून अमित शहा आपले सरकार आल्यास एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असे सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
दरम्यान, अलीकडेच कर्नाटक सरकारने मुस्लिमांचा ओबीसी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा :
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !
मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा
धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू
महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार