एस.एफ.आय.आंबेगाव तालुका समितीचा पुढाकार
घोडेगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य साधन केंद्र, पुणे व आदीम संस्थेच्या सहकार्याने व एसएफआयच्या स्थानिक संयोजनातून आंबेगाव तालुक्यात आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत दोन गावात ग्रंथालय सुरू करण्यात आली.
माळवाडी (बोरघर) व शिवशंकर वसतिगृह, घोडेगाव येथे ग्रंथालय, सुरु करण्यात आले. या ग्रंथालयासाठी विशेष सहकार्य राज्य साधन केंद्र पुणे व आदिम संस्थेने केले. या ग्रंथालयाचे स्थानिक संयोजन एसएफआय आंबेगाव तालुका समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. या ग्रंथालयाला प्रत्येकी एक कपाट आणि काही पुस्तके भेट देण्यात आली आहेत. यामध्ये लहान मुलांना गोष्टीची पुस्तके, कथा, कांदबरी व स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप देण्याची मागणी, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
गावोगाव वाचन चळवळ वाढावी हाच मुख्य उद्देश समोर ठेऊन या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्यात आलेले आहे. पुढील काळात इतरही काही गावांत ग्रंथालये सुरू होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी जास्तीत जास्त गावात ग्रंथालये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे यावेळी एसएफआय आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष दीपक वाळकोळी यांनी बोलताना सांगितले.
बिरसा ब्रिगेड च्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
माळवाडी, बोरघर येथील ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी एसएफआय आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष दिपक वालकोळी, कोष्याध्यक्ष रोहिदास फलके, गावातील ग्रामस्थ अनंता बांबळे, मारुती मरभळ, कुंडलिक पोटे, भीमा बांबळे, चिंतामण तिटकारे आदी उपस्थित होते. तर शिवशंकर येथील उदघाटन प्रसंगी वसतिगृहाचे लांडे सर, एसएफआय वसतिगृह युनिटचे अध्यक्ष राम बांबळे, सचिव शिवम भारमळ आदी विद्यार्थी उपस्थित होते.
ही ग्रंथालये सुरू करण्यासाठी राज्य साधन केंद्र, पुणे व आदीम संस्थेने केलेल्या सहकार्यबद्दल, स्थानिक ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी राज्य साधन केंद्राचे व आदीम संस्थेचे विशेष अभिनंदन याप्रसंगी केले.
गायीच्या दुधाला 42 रूपये प्रति लिटर भाव द्या – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी
LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये