Monday, February 17, 2025

Junnar : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बारावी कला शाखेत जुन्नर तालुक्यात अल्फिया पठाण प्रथम

Junnar : जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील येणेरे गावातील एक सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील अल्फिया पठाण ही विद्यार्थीनी बारावी बोर्ड परीक्षेत जुन्नर तालुक्यात कला शाखेत ९०.६७% एवढे सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत तिने उज्वल यश संपादन करून श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर व येणेरे गावचे नाव उज्वल केल्याबददल येणेरेचे सरपंच अमोल भुजबळ व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी तिचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. (Junnar)

तसेच जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे यांनी अल्फिया पठाण या गुणवंत विद्यार्थीनीचा गौरवचिन्ह व पुष्यगुच्छ देऊन विशेष सत्कार करून अभिनंदन केले. तसेच सर्व विश्वस्त मंडळ, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही बी कुलकर्णी, प्राचार्य डॉ एम बी वाघमारे, उपप्राचार्य डॉ आर.डी.चौधरी, उपप्राचार्या प्रा पी एस लोढा, पर्यवेक्षक प्रा. एस ए श्रीमंते आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद यांनी अल्फिया पठाण हिच्या उज्वल यशाचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. (Junnar)

अल्फिया पठाण हिचे मूळगाव हे जुन्नरच्या आदिवासी भागातील राळेगण हे आहे. परंतू वडिल नजीर पठाण हे मुलाणीचा व्यवसाय करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आई गृहिणी आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी येणेरे गावात ते व्यवसायानिमित्त सर्वजण स्थायिक झाले. नजीर पठाण यांना अल्फिया सह पाच मुली व एक मुलगा आहे. त्याच्या सर्व मुली उच्चशिक्षित असून एम एस्सी व इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. तर अल्फिया हिला इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.२०% गुण मिळाले होते. तरी तिने सायन्स किंवा कॉमर्स शाखेत प्रवेश न घेता स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी तिने कला शाखेत प्रवेश घेतला. आणि कॉलेजच्या प्राध्यापकांचे उत्तम मार्गदर्शन व अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर तिने इयत्ता बारावीच्या परीक्षेत ६०० पैकी ५४४ हे एवढे सर्वाधिक गुण मिळवून जुन्नर तालुक्यात कला शाखेत प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.

ॲड संजय शिवाजीराव काळे (अध्यक्ष जु.ता.शि.शि.प्र.मंडळ जुन्नर)

“घरची प्रतिकूल परिस्थिती असूनही सुरुवाती पासून आई वडिलांचा शिक्षणासाठी असलेला पाठीबा व मला UPSC, MPSC स्पर्धा परीक्षेचे असलेले आकर्षण यामुळे दहावीत चांगले गुण मिळून ही मी पूर्णपणे विचार करून कला शाखेत प्रवेश घेतला. भविष्यात IAS अधिकारी होऊन भारतमातेची सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे”

अल्फिया पठाण, जुन्नर तालुक्यात कलाशाखेत प्रथम

“ग्रामीण व आदिवासी भागातील कु अल्फिया पठाण ही आमची विद्यार्थीनी स्वतःच्या क्षमतेवर व महाविद्यालयातील विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाने बारावी परीक्षेत तालुक्यात कला शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबददल आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इयत्ता १० वीच्या परिक्षेत ९० % पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयात अकरावीत मोफत प्रवेश दिला जात आहे”

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !

12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!

दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती – महेश लांडगे

Related Articles

- Advertisement -

Latest Articles