Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाधोक्याची घंटा! आंध्रात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, आधीपेक्षा १५ पट अधिक घातक

धोक्याची घंटा! आंध्रात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, आधीपेक्षा १५ पट अधिक घातक


नवी दिल्लीः
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात गंभीर स्थिती असताना  आता चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. आंध्र प्रदेशात करोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हायरसला AP Strain आणि N440K असे नाव देणअयात आले आहे. सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या (CCMB) शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. देशात सध्या असलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनपेक्षा आंध्रातील कोरोनाचा नवीन स्ट्रेन १५ पट अधिक धोकादायक असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

राजकारण्यांना दोष देणं बंद करा, राजकीय क्विज खेळा

आंध्रातील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला ३ ते ४ दिवसांत हायपोक्सिया किंवा डिस्पनिया होतो. अशा परिस्थितीत श्वास हा रुग्णाच्या फुप्फुसापर्यंत पोहोचणं बंद होतं. योग्य वेळी उपचार आणि ऑक्सिजन सपोर्ट न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. देशात गेल्या काही दिवसांमध्ये याच व्हायरसमुळे अधिक मृत्यू होत आहेत.

कुरनूलमध्ये सापडला व्हायरस, वेगाने होतो प्रादुर्भाव

सर्वात पहिले हा स्ट्रेन आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये आढळला. हा व्हायरस नागरिकांमध्ये वेगाने पसरतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे हा व्हायरस उत्तम प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांनाही आजारी पाडतो. या स्ट्रेनमुळे नागरिकांच्या शरीरात साइटोकाइन स्टॉर्मची समस्या निर्माण होते, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

हा स्ट्रेन तरुण आणि लहान मुलांमध्ये वेगाने पसरतो. वेळीच ही साखळी तोडली नाही तर करोनाची ही दुसरी लाट आणखी भयंकर होऊ शकते, कारण सध्या असलेल्या B.1617 आणि B.117 या कोरोनाचा स्ट्रेनपेक्षाही अधिक धोकादायक आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय