महावीर की रोटी आळंदीत उपक्रमाची घोषणा
आळंदी / अर्जुन मेदनकर : भगवान महावीरांचे जीवन कसे समाजाभिमुख होते यावर त्यांनी आपले विचार मांडले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या तीर्थात एका तीर्थंकराचा जन्मकल्याणक महोत्सवात मला सहभागी होता आले हे माझे परमभाग्य आहे. भगवान महावीर यांनी समाजातील दिन-दुबळे, गोरगरीब यांच्या जीवनाचा उद्धार करण्याचे कार्य केले. त्यांचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण महावीर की रोटी हा उपक्रम आळंदीत सुरु करावा. जे स्वतः तरतात इतरांना तारतात ते तीर्थंकर असे विचार जैन साधू प्रशांत ऋषीजी मसा यांनी व्यक्त केले. alandi news
आळंदी येथील जैन स्थानक संघात जैनांचे २४ वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन साधू प्रशांत ऋषीजी मसा समाज बांधवाना प्रवचन सेवेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी आळंदी श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया, माजी नगराध्यक्ष शारदाताई वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अविनाश बोरुंदीया, काँग्रेस सेलचे राज्याध्यक्ष डॉ. मनोज रांका, मदनलाल बोरुंदिया, मोहनलाल चोपडा, संघाचे विश्वस्त राजेंद्र धोका, रमेश नवलाखा, राजेंद्र चोपडा, प्रमोद बाफना, राजेंद्र लोढा, सागर बागमार, श्याम कोलन, सचिन बोरूंदिया, दिलीप नहार यांचेसह आळंदी पंचक्रोशीतील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. alandi news
महावीर की रोटी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील दिनदुबळ्या, गरजूंना अन्नदान करावे या त्यांच्या आवाहनास सकल जैन संघाने प्रतिसाद देत या वर्षापासून दर महिन्याला एक दिवस महावीर की रोटी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मे महिन्यातील पाच तारखेला स्व. कांतीलालजी चोरडिया यांच्या स्मरणार्थ त्या दिवसाचा महावीर की रोटी या उपक्रमाचा खर्च युवा उद्योजक सतीश चोरडिया परिवाराने घेत असल्याचे जाहीर केले. alandi news
या निमित्ताने भगवान महावीर यांचे २७ भव म्हणजे जन्म यावर बायोग्राफी तनुजा लुनावत व सारिका कटारिया यांनी पाठशाळेतील बाल कलाकारांकडून सादर केली.
महिला मंडळाने महावीरांच्या जीवनावर नाटिका सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. जीवदया उपक्रमांतर्गत जमा झालेला ५ हजार १०० रुपये निधी डॉ. मंजुश्रीजी महाराज प्रणित भिवरी येथील गोशाळेस सुपूर्द करण्यात आला. संघातर्फे प्रशांतऋषीजी म.सा. यांचे मरकळ येथील वैराग्य आनंद तीर्थला ११ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
जयंती निमित्त भगवान महावीर यांचे प्रतिमेची भव्य मिरवणूक आळंदी शहरातून सवाद्यांच्या तालासुरात व नामजय घोषात झाली. आळंदी येथील भगवान महावीर जयंती निमित्त मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी स्वागत व महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वंदन केले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचेसह पोलीस प्रशासनाने मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. गौतमी प्रसादीने जयंती उत्सवाची सांगता झाली. सूत्र संचालन ज्योती चोरडिया यांनी केले.


हे ही वाचा :
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी