Home पुणे - पिंपरी चिंचवड Alandi : आळंदीत पिण्याचे पाणी नियमित पुरेशा दाबाने पुरवठा करा – दिनेश...

Alandi : आळंदीत पिण्याचे पाणी नियमित पुरेशा दाबाने पुरवठा करा – दिनेश घुले

Alandi

मुख्याधिकारी केंद्रे यांना साकडे ; आंदोलनाचा इशारा (Alandi)

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ ते ९ या परिसरातील रहिवासी नागरिक यांना पिण्याचे पाणी नियमित, पुरेशा दाबाने पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पुढील काळात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा. अन्यथा या मागणीस सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि यास आळंदी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा खणखणीत इशारा माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी दिला आहे. (Alandi)

आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन घुले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत साकडे घातले आहे. आळंदीत नियमित उच्च दाबाने पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने तसेच अनियमित आणि झोन निहाय होणं-या पाणी पुरवठ्यावर महिला, नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. यामुळे महिला वर्ग हैराण झाला आहे. आळंदीत सद्या दोन दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे. मात्र यातून नागरिक समाधानी नाही. होणारा पाणी पुरवठा हा अनियमित, कमी दाबाणे अपुरा होत आहे. तसेच वेगवेगळ्या कामा निमित्त अधिकचा पाणी पुरवठा बंद राहत असल्याने अनेकांना कधी कधी तीन ते चार दिवसांनी पाणी मिळते.

आळंदीत पाणी पुरवठ्याचे कामकाजावर नागरिकांचा रोष आहे. नागरिकांचे घरी पाणी साठवण यंत्रणा नसल्याने अनेकांना पाणी पुरवठ्याचे नियोजन अभावी गैरसोय होत आहे. यामुळे पाणी पुरवठा विभागावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.

स्थानिक संस्थेचे प्रमुख या नात्याने पर्यायी जबाबदारी आपणावर येत असून नियमित पुरेशा प्रमाणात उच्चं दाबाने पाणी पुरवठा प्रभाग क्रमांक ७. ८ व ९ या भागात मिळावा. यासाठी निवेदन देण्यात आल्याचे घुले यांनी सांगितले. नगरपरिषदेने जाहीर केलेल्या झोन प्रमाणे तसेच आता झोन ला देखील रोटेशनने पाणी पुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. (Alandi)

आळंदीत रात्री अपरात्री होणारा पाणी पुरवठा यामुळे देखील महिला वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे. रात्री उशिरा पाणी येत असल्याने सकाळी कामावर जाण्यास देखील धावपळ करावी लागते. यातून आळंदीत प्रचंड नाराजी आहे. झोन निहाय दिलेल्या वेळेत पाणी पुरवठा व्हावा. रात्री अपरात्री होणारा पाणी पुरवठा बंद व्हावा. शक्यतो रात्री दहा वाजे पर्यंत संपूर्ण आळंदीत पाणी पुरवठा पूर्ण होईल असे तात्काळ नियोजन करण्यात यावे. किमान दोन तास पाणी पुरवठा नियमित व्हावा अशी मागणी करीत अपुऱ्या दाबाने होणारा पाणी पुरवठा उच्चं दाबाने होण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आळंदीत या पुढील काळात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा. अन्यथा या मागणीस सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा खणखणीत इशारा घुले यांनी प्रशासनास दिला आहे.

हे ही वाचा :

पुणे महानगरपालिके अंतर्गत 179 पदांसाठी भरती ; विनापरीक्षा भरती

लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले वाचा !

‘मराठी माणसं भिकारी आहेत’ म्हणत कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला

बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस रणरागिणीने दिला चोप

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

Exit mobile version