Saturday, January 4, 2025
Homeताज्या बातम्याAlandi : प्रा. सुमती पवार यांचा आळंदी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Alandi : प्रा. सुमती पवार यांचा आळंदी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

आळंदी (अर्जुन मेदनकर) : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन जिल्हा जळगावचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आळंदी देवाची या ठिकाणी 4 जानेवारी 2025 वार शनिवार रोजी आयोजित आहे या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार तथा सुप्रसिद्ध कवयित्री नाशिक येथील मा. प्रा. सुमतीताई पवार यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप गोसावी व उज्जैनकर फाउंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे सर यांनी निवड पत्र, व गुलाब बुके देऊन नुकताच सत्कार केला. (Alandi)

प्रा.सुमतीताई पवार यांचे बाल साहित्यामध्ये सुद्धा विपुल लेखन आहे त्या उज्जैनकर फाउंडेशन ची गेल्या पाच सहा वर्षांपासून जोडलेले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या 745 व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा आळंदी येथे संपन्न होत आहे याप्रसंगी आदिशक्ती मुक्ताई कडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांना 750 फुटाची राखी सुद्धा प्रदान करण्यात येईल.

या सोहळ्यात सकाळी ग्रंथदिंडी उद्घाटन सोहळा तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार वितरण सोहळा पुस्तक प्रकाशन ओळख श्री ज्ञानेश्वरी व ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे दोन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर बोलीभाषेतील सांस्कृतिक कार्यक्रम, समारोपीय सत्र आणि रात्री ८ ते १० या वेळात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. (Alandi)

याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, साहित्यिक, रसिक उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय