मुंबई (वर्षा चव्हाण) : केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे जनसामान्यांसाठी अनेक योजना राबवत असते. मग या योजना कृषी संदर्भात असतील किंवा शेळी योजना असतील किंवा आरोग्य योजना असतील. शुन्य ते 18 वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम जाहीर केला आहे. (Mumbai)
विविध प्रकारच्या आजारांवर आता लाखो रुपये खर्च करण्याची पालकांना आवश्यकता नाही. करारानुसार शुन्य ते 18 वयोगटातील बालकांच्या जन्मजात हृदयरोग (कनंजेनायटल हर्ट डिसीज), अस्थिरोग शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी), ई.एन.टी. शस्त्रक्रिया (क्वाक्लिअर इंप्लान्ट), डोळ्यांचे उपचार हे उपचार होणार आहेत.
हे उपचार झाल्यावर त्यांचे पैसे आर.बी.एस. के. ने ठरलेल्या दरानुसार देण्यात येतील. याबाबतचा करार 23 मे रोजी कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केला आहे. (Mumbai)
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे तरी काय ?
० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना आजारानुसार शाळेतच औषध उपचार केले जातात. जर शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. ही सर्व जबाबदारी आरोग्य विभाग घेतो. कोणालाही रुपयाही देण्याची गरज नसते.
या शस्त्रक्रिया होतात मोफत
हृदय, कानाच्या अवघड शस्त्रक्रिया, हाडाच्या शस्त्रक्रिया, हर्निया, चिटकलेल्या जीभ यावर शस्त्रक्रिया होतात.
शाळा, महाविद्यालयात जाऊन तपासणी
शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यात संशयित वाटणाऱ्या मुलांना रुग्णालयात आणून त्यांच्या सर्व तपासणी केल्या जातात. त्यानंतर त्यांना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतील मोठ्या रुग्णालयांमध्ये नेऊन मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांत जाऊन आरबीएसकेच्या पथकाकडून ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी वर्षातून दोन वेळा भेट दिली जाते. ज्या मुलांना आजार दिसतील, त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठविले जाते. (Mumbai)
तेथे विशेष तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करून पुढील शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आतापर्यंत शेकडो मुलांवर टंग टाय,हृदय आदी मोठ्या शस्त्रक्रिया मोफ केल्या आहेत. शिक्षण विभाग, तालुका आरोग्याधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी व उपजिल्हा रुग्णालयांच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबविला जातो.
मुलांवर ज्युपिटर हॉस्पिटल, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, आनंदऋषीजी तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया केल्या जातात, अशी माहिती संबंधित एका डॉक्टरांनी दिली आहे.
योजनेसाठी हे आहेत पात्र व निकष
या उपचारांसाठी शुन्य ते 18 वयोगटातील सर्व बालके पात्र आहेत. त्यासाठी त्या बालकाचा शाळा शिकत असलेला दाखला, अंगणवाडी दाखला, बाळाचे आधारकार्ड, डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्र (मुंबई मधील हॉस्पिटल) आणि जिल्हा शल्यचिकित्सकांचे मंजुरी पत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
येथे कराल संपर्क
योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या आरबीएसके डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी किंवा आपल्या जवळील आरोग्यसेवक यांच्याशी संपर्क साधावा.