श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट ; इंद्रायणीच्या आरती (Alandi)
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील जया एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी भाविकांनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले.
मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता आणि इंद्रायणी आरती उत्साहात झाली. यावेळी महिला भाविकांची उपस्थिती मोठी होती.
आळंदी मंदिरात भाविकांनी परंपरेने एकादशी दिनी गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रींचे मानकरी, पुजारी, सेवक कर्मचारी आदि उपस्थित होते.
भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे नियंत्रणात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने केली.
मंदिरात दुपारचा फराळाचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री आरती झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. सप्ताहातील कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली.
Alandi
मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्ता वरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.
यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी मार्गदर्शन केले. आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी परिश्रम पूर्वक काम पाहिले.
आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून एकादशी दिनी मुक्तता मिळाली. आळंदीत भाविकानी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.
आळंदीत बेकायदेशीर वाहन पार्किंग आणि बेशीस्त वाहन चालकांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी आळंदीत रस्त्यावर वाहने पार्क करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात
येथील इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.
एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. त्या नंतर श्री हजेरी मारुती मंदिरात श्रींचे आरती हनुमान चालीसा पठण, श्रींचा नामजयघोष उत्साहात करण्यात आला.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका मालन घुंडरे पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख माऊली घुंडरे पाटील, राजेश नागरे, अभियंता अजित मेदनकर, बाळासाहेब ठाकूर, सोमनाथ बेंडाले, अमर गायकवाड, नेते गजानन गाडेकर, अनिता शिंदे, शालन होनावळे, शेखरबाई कदम, लता वरतले, मानसी सोळंखे, सुनीता शेळके, पुष्पा लेंडघर, सुरेखा कुऱ्हाडे, ताई देसले आदींसह भाविक उपस्थित होते.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येत असल्याचे यावेळी अनिता झुजम यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्तीसाठी सुरु असलेल्या उपक्रमात सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रमात सर्वानी सहभागी होऊन इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ कामकाज सुरु करण्याची गरज असल्याचे इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने संयोजक अर्जुन मेदनकर, अनिता झुजम यांनी आवाहन केले आहे.
मान्यवरांचे हस्ते इंद्रायणीची आरती नंतर पसायदान, प्रसाद वाटप उत्साहात झाले. हजेरी मारुती मंदिरात नित्यनैमित्तिक साप्ताहिक श्रींची आरती, हनुमान चालीसा, हरिनाम जय घोषात पसायदान, प्रसाद वाटप उत्साहात झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.