Home पुणे - पिंपरी चिंचवड Alandi : आळंदीत कॅन्सर प्रतिबंधात्मक जनजागृती हळदी कुंकू उत्साहात

Alandi : आळंदीत कॅन्सर प्रतिबंधात्मक जनजागृती हळदी कुंकू उत्साहात

महिलांचा मोठा प्रतिसाद, सामाजिक बांधिलकीतून उपक्रम (Alandi)

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन संचलित इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभात कॅन्सर विषयी जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम, मोफत तपासणी व उपचार या उपक्रमांतर्गत व्याख्यानास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. (Alandi)

या प्रसंगी या सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या उपक्रमास आळंदी शहरातील महिला बचत गट पदाधिकारी, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, महिला, शिक्षक, इतर क्षेत्रातील महिला – पुरुषांनी भरभरून प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमात जनजागृती करीत पुढील कार्यक्रम घरोघरी जाऊन सर्वे ( हर – घर सर्वे ) उपक्रम राबवून कॅन्सर विषयी जनजागृती करणे व मोफत उपचार आणि तपासणी करून आळंदीकरांचे आरोग्य जपणे हा उद्देश नक्कीच साध्य होईल असा आशावाद डॉ. नितीन गोसावी यांनी व्यक्त केला.

हर – घर सर्वे उपक्रमाची सुरुवात पुढील आठवड्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आळंदी शहरातील सर्व प्रभागात हा सर्व्हे होणार असून नागरिकांनी घरभेटीसाठी आलेल्या सर्व्हेचे पथकास माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी समस्त आळंदीकर रहिवासी यांनी मार्गदर्शन, सकारात्मक मदत होईल अशी अपेक्षा यावेळी श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन विश्वस्त डॉ. सोनाली देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

यात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, राजेश नागरे, श्रीधर घुंडरे, महिला बचतगट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, संगीता फफाळ, मंगला हुंडारे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रकाश काळे म्हणाले, कुटुंब प्रमुख महिला कुटुंबातील सर्वाची काळजी घेतात. मात्र आपल्या स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळचे वेळी दवाखान्यात जाऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन काळे यांनी केले.
Alandi
आळंदीकरांचे श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन संचलित इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Exit mobile version