Sunday, January 5, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदीत एक दिवसीय तिसरे शिवबाल, किशोर, युवा मराठी साहित्य संमेलन...

Alandi : आळंदीत एक दिवसीय तिसरे शिवबाल, किशोर, युवा मराठी साहित्य संमेलन ४ जानेवारीला आयोजन

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव व आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या ७४५ व्या जन्मोत्सवानिमित्त,आळंदीमध्ये तिसरे राज्यस्तरीय शिव बाल ,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन होत आहे. याच निमित्ताने आळंदी येथे आज दि .2 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर, जळगाव,यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. (Alandi)

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव व आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या ७४५ व्या जन्मोत्सवानिमित्त, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांच्या सहकार्याने शनिवारी ( दि. ४ ) ४ जानेवारी सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत एक दिवशींय तिसरे राज्यस्तरीय शिवबाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आळंदी येथील मोरया मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती संमेलन स्वागताध्यक्ष सुरेंद्र हेरकळ, उजैनकर फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवशरण उजैनकर यांनी दिली.

या संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होत आहे. संमेलनास ह. भ. प. मारुती महाराज कुरेकर, व डॉ. नारायण महाराज जाधव यांचे आशीर्वाद लाभणार आहेत.

संमेलनाध्यक्षपदी प्रा. सुमतीताई पवार या आहेत. या संमेलनाच्या कार्यकारणीत फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष संमेलन संयोजक प्रकाश काळे, अजित वडगावकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संमेलन कार्याध्यक्ष सुरेश वडगावकर, सहकार्याध्यक्ष रामचंद्र कुऱ्हाडे पाटील, निमंत्रक पदी रूपाली चिंचोलीकर, सहनिमंत्रकपदी डॉ. ज्ञानेश्वर पाटील, स्वागताध्यक्षपदी प्रा. डॉ. सुरेंद्र हेरकळ, प्रसिद्धी प्रमुख व कार्यवाह अर्जुन मेदनकर आदी पदाधिकारी कार्यरत आहेत. (Alandi)

संमेलनात आदीशक्ती संत मुक्ताई कडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांना ७५० व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवी वर्ष निमित्त ७५० फूट लांब व ७५ किलो वजनाची ( जगातील सर्वात वजनदार राखी बांधून या संमेलनाचे त्यानंतर उद्घाटन ४ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी माऊली मंदिर परिसरामध्ये निघणार आहे.

या राखीमध्ये २१ किलो टाळ, २१ किलो रुद्राक्ष, ११ किलो चिपळ्या, ५ किलो तुलसीमाळ, ११ किलो कापड रेशीमदोरा, माउलीचे नाणे, ६ किलो प्रतीक चिन्ह वापरण्यात आली असल्याचे स्वागताध्यक्ष हेरकळ यांनी सांगितले.

जगातील सर्वात वजनदार राखी माईर्स, एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेज, आळंदी यांच्या तर्फे तयार करून सुपूर्द करण्यात येणार आहे. राखी एमआयटी संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या हस्ते माऊलींना अर्पण करून ग्रंथ दिंडी निघेल.

या अनोख्या अध्यात्मिक साहित्य संमेलनात रक्षाबंधन सोहळ्यास संत निवृत्तीनाथ देवस्थान, संत सोपानकाका देवस्थान, संत तुकाराम देवस्थान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पदाधिकारी निमंत्रित आहेत. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थाच्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांचे तर्फे ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली आहे.

उद्घाटन सोहळ्यास सुरेश वारे, वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव नाना महाराज चंदिले, आळंदी संस्थांचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त निरंजन योगी नाथसाहेन , डॉ. अजय कुमार लोळगे, विलास सिंदगीकर डॉ. राजेश गायकवाड, डॉ. सतीश तराळ , डॉ. सुभाष बागल, सर्जेराव साळवे, जगन्नाथ बुदुखले उजैंनकर फाऊंडेशनचे विविध पदाधिकारी, आळंदीकर नागरिक, पदाधिकारी, रसिक, काही, लेखक,साहित्यिक उपस्थित रहाणार असल्याचे अध्यक्ष शिवशरण उजैनकर यांनी सांगितले. (Alandi)

विविध सत्रात संमेलन होत आहे. यात परिसंवाद, सांस्कृतिक साहित्यिक मेजवानी, कवी संमेलन आणि पुरस्कार वाटप देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार अर्जुन मेदनकर यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय