मुंबई : मुंबई कधीही झोपत नाही, अशा ठिकाणी एका निष्पाप मुलीवर अन्याय केला जातोय, राज्य सरकारची मान शरमेने खाली घालणारी ही बाब आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील महिला वसतिगृहात झालेल्या मुलीच्या बलात्कार व हत्येप्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे अशा घटना घडत असतील तर यातून राज्यात कुठेही महिला, मुली सुरक्षित दिसत नाहीत. या सर्व घटनेला पोलिस प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप अजित यांनी केला. अशा घटना सातत्याने वाढत असताना सरकार त्यावर कठोर भूमिका का घेत नाही? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला.
सदर घटनेतील नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कोणी घेतले याची माहिती समोर येण्यासाठी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार अशाप्रकारे निष्काळजीपणा दाखवणार असेल तर त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. राज्य सरकारने राज्यभरातील महिला वसतिगृहांमधील सुरक्षायंत्रणा व्यवस्थित आहे का, याचा तपास करावा. तसेच या गैरकृत्याचा छडा लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
हे ही वाचा :
कोल्हापुर : संभाजीराजे छत्रपतींनी संताप केला व्यक्त, दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी
शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र हादरला! हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे; नंतर कुकरमध्ये उकळले
नागपूर : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
ICAR : सोलापूर येथील राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत विविध पदांची भरती
तलाठी कार्यालयात काम करणारे दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात