Sunday, December 22, 2024
Homeराज्यAISF चे राज्य अधिवेशन संपन्न; नवीन कार्यकारिणी जाहीर

AISF चे राज्य अधिवेशन संपन्न; नवीन कार्यकारिणी जाहीर

नाशिक : दि. 21 मे 2023 रोजी नाशिक येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य कौन्सिल चे 16 वे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यात महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून विराज देवांग (नाशिक) यांची फेरनिवड करण्यात आली तर सचिव पदी वैभव चोपकर (भंडारा) यांची निवड करण्यात आली. 

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य कौन्सिल चे 16 वे राज्य अधिवेशन नाशिक सिडको परिसरातील नारायण मेघाजी लोखंडे सभागृह, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय येथे उत्साहात पार पडले. देशातील अग्रणी मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड तसेच ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जायभावे यांनी अधिवेशनाचे उद्घाटन करून खुल्या सत्राला संबोधित केले. अधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून एआयएसएफ च्या राष्ट्रीय छात्रा समन्वयक संघमित्रा जेना (भुवनेश्वर), राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकज चव्हाण, माजी राष्ट्रीय महासचिव ॲड. अभय टाकसाळ उपस्थित होते. अधिवेशनात मागच्या तीन वर्षांतील संघटनात्मक कामाच्या अहवालावर प्रतिनिधी सत्रात चर्चा करण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याच्या अमलबजावी मुळे उद्भवणाऱ्या समस्या आदिंसोबत राज्यात व देशात सुरू असलेल्या विविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक घडामोडींवर आधारित अहवाल सादर करण्यात आले व त्यावर सखोल चर्चा करण्यात आली. 

अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात पुढील तीन वर्षांच्या कालावधी साठी 47 सदस्यांची राज्य कौन्सिल तर 21 सदस्यीय कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी विराज देवांग (नाशिक) यांची राज्य अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली, राज्यसचिव पदी वैभव चोपकर (भंडारा), राज्य उपाध्यक्षपदी धीरज कठारे (कोल्हापूर) आणि निलम जगताप (सांगली) तर सहसचिव पदी प्राजक्ता कापडणे (नाशिक) आणि प्रसाद गोरे (परभणी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

येत्या शैक्षणिक वर्षात एक लाख सदस्य नोंदणीसोबत राज्यातील 250 तालुक्यात संघटना बांधणीचे उद्दिष्ट्य समोर ठेऊन राज्यातील सर्व विद्यापीठात शाखा बांधणीसाठी संघटना कटिबध्द असल्याचे याठिकाणी जाहीर करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात तसेच राज्यातील विविध प्रशासकीय विभागातील रिक्त जागांच्या सोबत राष्ट्रीय कृत बँकेतील रिक्त जागांच्या प्रश्नासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला.

रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरतीची घोषणा; 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय