भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर 8,000 फूट उंचीच्या खिंडीच्या उत्तर-पश्चिमेकडील मंडलाजवळील डोंगराळ प्रदेशात उतरण्यापूर्वी सकाळी 9.15 कोसळले.
गुरुवारी(16 मार्च)हेलिकॉप्टरने काही तासांपूर्वीच आसाममधील लष्कराच्या मिसामरी तळावरून उड्डाण केले होते.
लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी (37) आणि मेजर जयंत ए (35) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वैमानिकांची लष्कराने ओळख पटवली आहे.
लष्कराने या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. अरुणाचल प्रदेशातील अनेक जीवघेण्या अपघातांसाठी खराब हवामान जबाबदार आहे.