संगमनेर (अहमदनगर) : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विविध समस्या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी तरुणांची मोठ्या प्रमाणात वाढलेली बेरोजगारी, आदिवासी क्षेत्रात धान, वरई, नाचणी लागवड कामाचा रोहयोत समावेश करावा, धनगर जात व आदिवासी जमात या संदर्भात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला आहे तो अहवाल शासनाने तात्काळ जाहीर करावा व आदिवासींच्या विविध समस्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप गवारी, छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश जुंदरे उपस्थित होते.