Thursday, December 26, 2024
Homeजिल्हा...पुन्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड, घेतला हा महत्वाचा निर्णय

…पुन्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड, घेतला हा महत्वाचा निर्णय

आज दिवसभर सांगलीतील पूरग्रस्त गावांची पाहणी

सांगली / आनंदा कांबळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील २०१९ च्या महापूरादरम्यान ज्यापद्धतीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले होते. आज त्याच पद्धतीने जयंतराव पाटील पूरग्रस्त भागात ऑन ग्राऊंड उतरले आहेत. 

ना. जयंत पाटील आज सकाळपासूनच पूरग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सकाळी वाळवा तालुक्यातील बहे, हुबालवाडी, बोरगाव या गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

परवापासून हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली आहे. मात्र अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही असे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

स्थलांतरित नागरिकांची होणार अँटीजन टेस्ट

सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. जीवितहानी होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. खबरदारी म्हणून या स्थलांतरीतांची अँटीजन टेस्टही केली जात आहे. पूराच्या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.


संबंधित लेख

लोकप्रिय