Thursday, December 12, 2024
Homeकृषीऍड. समीर शिंदे यांची किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

ऍड. समीर शिंदे यांची किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी ऍड. समीर शिंदे यांची निवड करण्यात आली.

किसान सभेची जिल्हा बैठक पार पडली. बैठकीची सुरुवात किसान सभेचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले होते. 

नाशिक जिल्हा बँक ने नियमित कर्ज फेड करणाऱ्या ना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, कर्ज मुक्ती पासून वंचित उपसा जल सिंचन संस्था ची बैठक घेण्यात येणार आहे, तसेच २०१९ मध्ये शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अनुदान अद्याप मिळालेले नाही, कसत असलेल्या वनजमिनी नावावर कराव्यात, मका खरेदी केंद्र वरती खरेदी सुरू ठेवावीत, मनरेगाच्या कामात शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश करावा, दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावी आदी मागण्यांंना घेऊन येणाऱ्या काळात आंदोलन करण्यात येणार असल्याचे ठरले. 

सदर बैठकीत ऍड. समीर शिंदे यांची जिल्हा उपाद्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा अध्यक्ष भास्कर शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस जिल्हा सचिव देविदास बोपळे, संघटक विजय दराडे, ऍड. दत्तात्रय गांगुर्डे, सुखदेव केदारे, विनायक शिंदे, नामदेव बोराडे, नामदेव राक्षे, दशरथ कोतवाल, शबू पुरकर, लक्ष्मण आहेर इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय