Monday, March 31, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार, दिशा सालियन प्रकरणी वडिलांचे गंभीर आरोप

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. दिशा सालियन (Disha Salian case) यांचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. 

---Advertisement---

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेत या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली असून, केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) तपास व्हावा, अशी विनंती केली आहे. या आरोपांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

प्रकरणाचा घटनाक्रम (Disha Salian case)

दिशा सालियन यांचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून झाला होता. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला याला आत्महत्या किंवा अपघात मानले होते. दिशा त्या रात्री तिच्या मंगेतर रोहन राय आणि मित्रांसोबत पार्टीत सहभागी झाली होती, असे पोलिसांचे म्हणणे होते. तथापि, या घटनेनंतर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी (14 जून 2020) जोडून अनेक षड्यंत्र सिद्धांत पुढे आले. दिशाच्या मृत्यूबाबत सुरुवातीला तिच्या कुटुंबाने पोलिसांच्या तपासावर विश्वास दर्शवला होता आणि कोणत्याही गैरकृत्याचा संशय नसल्याचे म्हटले होते. परंतु, आता तिचे वडिल सतीश सालियन यांनी युटर्न घेत हा दावा मागे घेतला आहे.

---Advertisement---

दिशा सालियन यांच्या वडिलांचे गंभीर आरोप

सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटले आहे की, “माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तिची हत्या झाली आहे आणि यात सामूहिक बलात्काराचा समावेश आहे.” त्यांनी असा आरोप केला की, दिशाचा मृत्यू झाला तेव्हा मुंबई पोलिसांनी आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर दबाव टाकून आत्महत्येचा बनावट नॅरेटिव्ह तयार केला. “आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आले आणि पुरावे खरे मानण्यास भाग पाडले गेले,” असे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. तसेच, पोस्टमॉर्टम अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सतीश सालियन यांनी एका मुलाखतीत म्हटले, “14व्या मजल्यावरून पडलेल्या व्यक्तीच्या शरीरावर एकही जखम नाही, रक्ताचा थेंब नाही, हे कसे शक्य आहे? तिचे कपडेही संशयास्पद अवस्थेत होते. हे आत्महत्या किंवा अपघात असू शकत नाही.” त्यांनी तपासात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, “आम्हाला धमक्या देण्यात आल्या आणि जबाब नोंदवण्यास मनाई करण्यात आली,” असेही सांगितले.

आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यावर संशय

याचिकेत उल्लेख आहे की, दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे सतत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. तसेच, त्याच कालावधीत रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सोबत त्यांनी 44 वेळा फोनवर संवाद साधला. यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाई डिटेक्टर चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिशा सालियन यांच्या मृत्यूला पाच वर्षे उलटून गेली असली, तरी हे प्रकरण अजूनही रहस्यमय बनले आहे. सतीश सालियन यांच्या नव्या आरोपांमुळे आत्महत्या की हत्या हा प्रश्न पुन्हा ताजा झाला आहे. आता न्यायालयाचा निर्णय आणि नव्या तपासाचे निष्कर्ष या प्रकरणातील सत्य उघड करू शकतील. तोपर्यंत, हा वाद कायदेशीर आणि राजकीय पातळीवर चर्चेचा विषय राहणार आहे.

हे ही वाचा :

राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती होणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर हिंसाचार प्रकरण ; हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

पुण्यात बसला भीषण आग ; चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची अंतराळातून यशस्वी पृथ्वीवर पुनरागमन

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles