Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi : आळंदी शहरात नियमित पाणी पुरवठ्या उपाय योजना करा – दिनेश घुले

दोन स्वतंत्र पाईप लाईनसह पम्पिंग आणि साठवण टाक्यांची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा (Alandi)

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी नगरपरिषद शहरास पिण्याचे पाणी पुरवठा करीत असून भामा आसखेड कुरुळी टँपिंग मधून आळंदीस मंजूर १० एम.एल.डी कोठ्यातून सध्या ७ एम.एल.डी. पाणी उचलत आहे. वास्तविक आळंदीचा मंजूर कोठा १० एम.एल.डी असताना तसेच पाण्याची प्रचंड मागणी असताना पाणी कमी उचलले जाते यातून आळंदीकरांत नाराजी आहे. आळंदीला नियमित पाणी पुरवठ्यास दोन स्वतंत्र पाईप लाईनसह पम्पिंग आणि साठवण टाक्यां उपाय योजने अंतर्गत तातडीने विकसित करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे. (Alandi)

---Advertisement---

या संदर्भात माजी नगरसेवक घुले यांनी आळंदी नगरपरिषदेस निवेदन देवून लक्ष वेधले आहे. आळंदी शहरास पिण्याचे पाणी गोपाळपुरातील पाणी पुरवठा केंद्रातून शुद्धीकरण केले जाते. येथून ते आळंदी हवेली येथील डोंगरा वरून पुन्हा आळंदी हवेली आणि आळंदी खेड येथील जलकुंभ भरत आळंदी शहरास देत असताना पाणी पुरवठा विलंबाने होतो. नागरिकांना नियमित पुरेशा प्रमाणात आणि उच्च दाबाने नियमित, रोज पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Alandi)

यासाठी आळंदीत पाणी साठवण क्षमता वाढीसाठी दोन पाणी साठवण टाक्या, दोन जलकुंभ तात्काळ विकसित करण्याची आत्यानी व्यक्त केली आहे. पाणी शुद्धीकरणा नंतर ते आळंदी हवेली आणि आळंदी खेड यांना एकाच वेळी वितरित करण्यासाठी दोन स्वतंत्र तसेच पम्पिंग आणि स्वतंत्र जलनलिका पाईप लाईन चे काम हाती घेऊन प्राधान्याने जुनी जलशुद्धीकरण यंत्रणा, पम्पिंग व्यवस्था देखभाल दुरुस्ती करून वापर योग्य झाल्यास शहरास पाणी पुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.

यामुळे आळंदी खेड आणि आळंदी हवेली या भागात एकाच वेळी पाणी पुरवठा होऊन झोन देखील कमी होऊन नागरिकांना रात्री अपरात्री, उशीरा होणारा पाणी पुरवठा वेळेत तसेच विनाविलंब होण्यासाठी मागणी प्रमाणे तात्काळ उपाय योजना व्हाव्यात असे साकडे आळंदीकरांचे वतीने माजी नगरसेवक घुले यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन घातले आहे. (Alandi)

प्रभाग क्रमांक ८ साठी पाण्याची आणि सांडपाणी ड्रेनेज लाईनची मागणी येथील प्रभाग क्रमांक ८ मधील नागरी सुविधा अभावी गैरसोय होत असल्याने हिंदवी कॉलनी क्रमांक १ मध्ये पिण्याचे पाण्याची पाईप लाईन मागणी करण्यात आली आहे. नियमित पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी नवीन ३ इंची पिण्याचे पाण्याची लाईन नागरिकांचे सोयी साठी विकसित करून डोंगरा वरील नागरिकांना दिलासा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

याच प्रभागात साखरे महाराज पेट्रोल पंप ते देहू फाटा गजानन महाराज मंदिर समोरून लहान ड्रेनेज असल्याने पाणी सतत रस्त्यावर येऊन नागरिकांना गैरसोय होत आहे. घाण पाण्यातुन चालावे लागते. या मुळे नागरिकांत नाराजी वाढली आहे. यासाठी २ फूट व्यास रुंदीची ड्रेनेज लाईन टाकल्यास ड्रेनेज तुंबून घाणीचे साम्राज्य दूर होण्यासाठी प्राधान्याने विकास कामे हाती घ्यावीत. अशी मागणी करीत प्रशासनांस खणखणत इशारा देत कामे न झाल्यास याच मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असे घुले यांनी सांगितले. देहू आळंदी रस्त्यावरील ड्रेनेज लाईंनचे काम तात्काळ हाती घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहिदास कदम यांनी सांगितले.

वारकरी भाविक या भागातून अनवाणी पायाने ये जा करीत असतात. मात्र सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles