दिल्ली : गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सिंधू बॉर्डरवर गेला होता. त्यावेळी त्याने थंडीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दिलजीतनं एक कोटी रुपयांची रक्कम मदत केली.
कडाक्याच्या थंडीमध्येही तुम्ही आंदोलन करत आहात. सर्व शेतकऱ्यांना माझा सलाम आहे. शेतकऱ्यांनी नवीन इतिहास लिहिला आहे. येणाऱ्या पिढीला हा इतिहास सांगितला जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी कोणीही वाढवू शकत नाही, असे दिलजीत म्हणत आंदोलनाला पाठिंबा दिला.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थंडीपासून आराम मिळावा यासाठी स्वेटर किंवा चादर खरेदी करण्यासाठी दिलजीतनं एक कोटी रुपयांची रक्कम दिली आहे.
याबाबतची माहिती पंजाबी गायक सिंघा यांनी दिली आहे. सिंघा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत दिलजीतनं एक कोटी रुपये मदत केल्याचे सांगितले. तसेच आंदोलनाला पांठिबा दिल्याबद्दलही दलजीतचे आभारही व्यक्त केले आहेत.