Saturday, May 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

NTA : एनटीए ही संस्था रद्द करा – एसएफआय–डीवायएफआय ची जोरदार निदर्शने

रामटेक (नागपूर) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) ने एनटीए (NTA) ही संस्था रद्द करा, केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा द्या, ही मागणी करत नागपूर येथे दुपारी ४ वाजता जोरदार निदर्शने केली. (NTA)

---Advertisement---

नुकतीच मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणारी NEET-UG या परीक्षेत घोटाळा होऊन अनेक ठिकाणी पेपरलीक चां घटना पुढे आल्या आहेत. तर दुसरीकडे UGC NET ही परीक्षा पार पडल्यावर दुसऱ्याच दिवशी रद्द करण्यात आली. नीट पिजी ही परीक्षा १२ तासापूर्वी समोर ढकलण्यात आली होती. केंद्र सरकारचा परीक्षेतील अनियमितता व पुढे आलेल्या पेपरफुटीचां घटनामुळे संपूर्ण विदयार्थी व युवा पिढीचे भविष्य धोक्यात आले असून ज्यासाठी संपूर्ण सरकार, विशेषत: केंद्रीय शिक्षण मंत्री जबाबदार आहेत व त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, NTA ही संस्था रद्द करावी, NET आणि NEET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याना नुकसान भरपाई द्यावी, पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य NET स्कोअरची अलीकडेच स्वीकारलेली प्रणाली मागे घ्यावी, विद्यमान प्रवेश परीक्षा प्रक्रियेला माफिया ला पोषण देणाऱ्या केंद्रीकृत प्रक्रियेत बदलवण्याचे कारस्थान बंद करावे, सर्व एंटरन्स आणि पदभरती परीक्षा निःशुल्क करावे आदी मागण्या करण्यात आल्या. (NTA)

नीट युजी असो किंवा युजीसी नेट असो यामागे एकच पॅटर्न असून ज्याचा परिणाम देशातील उच्च शिक्षणाच्या महत्त्वाच्या क्षेत्रावर होत आहे. प्रथमदर्शनी जसं दिसते तसा हा केवळ शिक्षणातील भ्रष्टाचाराचा परिणाम नसून शिक्षण क्षेत्रातील केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि सांप्रदायिकीकरणाचा हा परिणाम आहे जे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (NEP २०२०) मूलभूत घटक आहेत असे डी. वाय. एफ.आय.चे जिल्हाध्यक्ष अमित हटवार यांनी म्हंटले आहे.

---Advertisement---

निदर्शनात कृणाल सावंत, प्रीतम वासनिक, संदेश रामटेके, करण गजभिये, संघर्ष हटवार, रजत लांजेवार, संकेत साखरे, यमन राऊत, आयुष सहित अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles