पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली जाधववाडी येथील अभिनव विद्यालयात जागतिक योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थी सकाळी योगा करण्यासाठी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.
संस्थेचे सचिव प्रताप भांबे व विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पवार सर ,परमेश्वर शिंदे मुख्याध्यापक प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगासनांची महत्व सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात व्यायाम हा महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा शिक्षक विष्णू रांगुळे सर यांनी केले. तर योगाचे प्रात्यक्षिक क्रिडाशिक्षिका वर्षा गेंगाणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. तसेच विद्यालयातील गवळी सर, अशोक येवले सर, दीपाली ढगे मॅडम, मनीषा कदम मॅडम व इतर सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
जागतिक योग दिनानिमित्त रहाटणीत योग शिबिर संपन्न
पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी
ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात सेवा सुविधांचा अभाव..