दिल्ली : देशभरातील ट्रक अन् टँकर चालक संप मागे घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे. हीट अॅण्ड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही, असे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले “आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे, सरकारला असे म्हणायचे आहे की नवीन नियम अद्याप लागू झाला नाही, आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय न्याय संहिता 106/2 लागू करण्यापूर्वी, आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ.”
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृत लाल मदन म्हणाले, “तुम्ही आमचे ड्रायव्हर नाही तर आमचे सैनिक आहात. तुमची कोणतीही गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहा वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच दंड आकारण्यात आला आहे, तो होल्डवर आहे. जोपर्यंत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची पुढील बैठक होत नाही तोपर्यंत कोणताही कायदा लागू केला जाणार नाही.” (Latest Marathi News)
हिट अँड रन कायद्यातील नवीन दंडात्मक तरतुदींविरोधातील आंदोलन लवकरच मागे घेण्यात येईल, असेही ट्रकर्स असोसिएशनने म्हटले आहे.”आम्ही भारतीय न्याय संहिता अंतर्गत तरतुदींबद्दल भेटलो आणि चर्चा केली, आणि सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे. नवीन कायदे अद्याप अंमलात आलेले नाहीत आणि ते AIMTC शी सल्लामसलत केल्यानंतरच लागू केले जातील,” ट्रकर्सच्या संघटनेने सांगितले.
सरकारसोबत बैठकीनंतर निघाला तोडगा! ट्रक चालक संप घेणार मागे
संबंधित लेख