Saturday, December 21, 2024
Homeराज्यपुण्यातील २२ वर्षीय तरूणाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू, परिसरात खळबळ

पुण्यातील २२ वर्षीय तरूणाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू, परिसरात खळबळ

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक दम लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील मैदानावर रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीतेज मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळत असताना त्याला अचानक दम लागल्याने तो खाली कोसळला. श्रीतेजच्या इतर मित्रांनी त्याच्यावर त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्रीतेजला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. श्रीतेज सचिन घुले असं या मृत्यूमुखी पडलेल्या २२ वर्षीय मुलाचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रीतेजच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून हडपसर परिसरात शोककळा पसरली आहे.

पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, 1600 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख

लोकप्रिय