Sunday, December 22, 2024
Homeताज्या बातम्याRaj Thackeray : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच...

Raj Thackeray : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

Raj Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले असून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) भाजप सोबत गेल्यानंतर आता मनसे भाजप (महायुती) सोबत जाण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मनसेच्या महायुती सोबत युतीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) थेट दिल्लीला गेले होते. 2019 मध्ये राज ठाकरे यांनी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसला पाठिंबा दिला होता. तेव्हा सभांमधला त्यांचा लाव रे तो व्हिडीओचा डायलॉग आणि त्यांच्या सभा दोन्ही गाजल्या होत्या. अशात 2024 च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची (Amit Shah) भेट घेतल्याने चर्चेला उधान आले आहे.

गेल्या काही दिवसांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदूत्वाची भुमिका घेतल्याने भाजपशी त्यांची जवळीकता वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील भाजपच्या मनसे सोबतच्या युतीला हिरवा कंदील दाखवल्याचे सांगितले जात आहे. अशात मनसे लवकरच महायुतीमध्ये सामील होणार, असं म्हटलं जातंय.

दरम्यान, मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळू शकतात.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

संबंधित लेख

लोकप्रिय