पुणे : पाच महिण्यांनंतर प्रवाशांच्या हितासाठी कामावर रुजू झालेल्या एस टी वाहक-चालक व कर्मचाऱ्यांचे फेटा बांधुन व श्रीफळ, फुल देऊन सन्मान आज वल्लभनगर आगार, व शिवाजीनगर पुणे येथे सत्कार करण्यात आला. आंदोलनातील मागण्या या टप्प्याटप्प्याने सुटत असतात एकाच वेळी सर्व मागण्या मान्य होणे शक्य नाही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ले सोडून व गुण नसलेला वकिल सोडून शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संवाद साधल्यास मागण्या मान्य होऊ शकतात. एसटी कर्मचार्यांच्या बाबतीत पाच दशकांपासून दीर्घ अनुभव असलेले नेते शरद पवार हेच एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात आणि सोडवतील असा विश्वास कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज प्रवाशांची बांधिलकी जपत कामगारांनी कामावर आलेल्यांचे स्वागत श्रीफळ, फुल देऊन, फेटा बांधून करण्यात आले.
10 वी व आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिन नागणे, राजेश माने, नाना कसबे, राजु बिराजदार, तुषार घाटोले, अशोक लोहकरे, मानिषा वाजे, संजय चव्हांण, अंकुश माने, दिनकर शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले, “सुमारे पाच महिन्यापासून प्रवाशांचे हाल होत आहेत. सोमवारी एका दिवसात राज्यातील १६ हजार १५४ एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत त्यात चालक ६ हजार ६६९ चालक तर ५ हजार ७८६ वाहकाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात ३ हजार कर्मचारी हजर झाले आहेत आता १ हजार ३३० फे-या होत आहेत. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, मुंबई ,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, पिंपरी-चिंचवड, सोलापूर या ठिकाणचे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. वाहकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ६१ हजार ६४७ एसटी कामगार कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील एसटी प्रवाशी विद्यार्थ्यांच्या, जेष्ठ, महिला प्रवाशी सेवेसाठी सुरू होणार असल्याचे समाधान प्रवाशांमध्ये निर्माण झालेले आहे. यामुळे शरद पवारांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे, ही बाब एसटी कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावी.
LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये
राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत अनेक कामगार कामावर रुजू झाले होते. परिवहनमंत्री अनिल परब हि मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जानेवारी महिन्यात २२ एसटी कामगार कर्मचारी संघटनांशी या चर्चे दरम्यान केले होते. गुण नसलेल्या वकिलांकडे न जाता भविष्यात सर्व मागण्या साठी व आपले प्रश्न सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे मागण्या मांडून मान्य करून घ्याव्यात असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 604 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी 3 दिवस बाकी