पिंपरी चिंचवड : 8 मार्च महिला दिनानिमित्ताने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संगीत-खुर्ची,चेंडू-फेक अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC) तसेच निमा वुमन फोरम च्या महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी डॉ. प्रज्ञा खोसे यांनी महिलांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. PCMC News
संगीत खुर्ची मध्ये गुलनाज शेख यांनी प्रथम तर मधुरा शिंदे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविले. कार्यक्रमाचे अध्यक्षा कॉ. अपर्णा दराडे होते त्यांनी महिला सशक्तीकरणाविषयी माहिती दिली, त्याच बरोबर कार्यक्रमाला सुरेखा कुटे, पुजा घाडगे, सुलभा पाचभाई, आफरीन शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ॲड.अमिन आर. शेख यांनी केले, आभार प्रदर्शन मंगेश कुटे यांनी मानले. सूत्रसंचालन आफताब आर. शेख यांनी केले. कार्यक्रमास कॉ. गणेश दराडे, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, मनोज शिंदे, आदर्श पांडे, भुजबळ काका, गनराज, गौरव पानवलकर उपस्थित होते.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा
जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’
मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा