Thursday, February 13, 2025

पंतप्रधान मोदींची आज यवतमाळ मध्ये सभा, सभेतील खूर्चीवर मात्र राहुल गांधींचे स्टिकर्स

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. Prime Minister Modi’s meeting in Yavatmal today, Rahul Gandhi’s stickers on the chair in the meeting

या मेळाव्यासाठी भारी परिसरात या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना पंतप्रधान संबोधित करणार आहे. दुपारी ४ वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे. या मेळाव्याच्या सभास्थळी 45 एकरावर सभामंडप उभारण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्वाचा समजला जात आहे. असे असताना या सभा मंडपातील खूर्च्यांवर मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्टिकर्स असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपुर्वी राहुल गांधी यांची नागपुरात सभा झाली होती. या सभेत ज्या खूर्च्या वापरण्यात आल्या होत्या, त्याच खूर्च्या आहे तशाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वापरण्यात येत आहे. विशेष म्हणजे या खूर्च्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्टिकर्स आहे. त्यावर स्कॅन टू डोनेट अशा आशयाचे स्टिकर्स असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या खूर्च्या एक चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

हेही वाचा :

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

ब्रेकिंग : ५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय

Related Articles

- Advertisement -

Latest Articles