Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यपतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही; जनतेत संभ्रम अथवा जनतेची दिशाभूल...

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही; जनतेत संभ्रम अथवा जनतेची दिशाभूल केल्यास कारवाई – डॉ. राजेंद्र शिंगणे

(मुंबई):- काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना विषाणूवर ‘कोरोनील’ व ‘स्वसारी’ या औषधे लॉन्च करत कोरोनावर गुणकारी असल्याचा दावा केला होता. मात्र त्यावेळी आयुष्य मंत्रालयाने याची गंभीर दखल घेत नोटीस पाठवली होती. त्यानंतर बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

      त्यानंतर राजस्थान सह महाराष्ट्रात कोरोनावरील पतंजलीच्या औषधांवर बंदी घातली होती. अशातच आता जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

      पतंजलीच्या कोरोनील औषधाने COVID -19 बरा होत नाही. पतंजलीच्या ‘कोरोनील’ व ‘स्वसारी’ या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल असे डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी म्हंटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय