१. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम.
अंतिम वर्षाच्या परिक्षांसंदर्भात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यामध्ये राज्यात परिक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
२. CBSE अभ्यासक्रमातून धर्मनिरपेक्षता, संघराज्य, लोकशाही हक्क, नागरिकता, राष्ट्रीयत्व प्रकरणे वगळण्याच्या निर्णयाला सिटूने केला विरोध.
केंद्र सरकारने CBSE अभ्यासक्रमातून धर्मनिरपेक्षता, संघराज्य, लोकशाही हक्क, नागरिकता, राष्ट्रीयत्व, जनचळवळ, लोकशाही हक्क, नवीन सामाजिक चळवळी, नियोजन आयोग, पंचवार्षिक योजना, अन्नसुरक्षा, विविधता, जाती, धर्म आणि लिंगभेद इत्यादी संबंधातील अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सेंटर ऑफ ट्रेंड युनियन(सिटू) ने विरोध करत अभ्यासक्रम समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
३. ट्विटर वर #BycottUGCGuideline मोहीम.
युजीसीच्या ६ जुलैच्या निर्देशनाचा विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने ट्विटर वर मोहीम राबवली. हि ट्विटर मोहीम ४ नंबर होती. मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचे दिसून आले.
४. ‘सीबीएसई’च्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८८. ७८ टक्के.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ `सीबीएसई`च्या बारावीच्या परीक्षेत ८८ पूर्णांक ७८ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात मुलींनी अधिक यश मिळवलं आहे. आज हे निकाल जाहीर करण्यात आले असून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गुणवत्ता यादी घोषित न करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. यंदा ज्या विषयांच्या परिक्षा रद्द झाल्या होत्या त्या विषयांत विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्यात आले आहेत.
५. अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक.
कर्ज घेवून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, परंतु नंतर असे आढळले की केवळ पदवी (फेक डिग्री) बनावट देण्यात आली आहे. त्या आधारे कुणीही पुढील शिक्षण ही घेऊ शकत नाही किंवा नोकरीही मिळणार नाही. विद्यार्थ्यांवरील कर्ज वाढत आहे. अमेरिकेत शैक्षणिक संस्थांच्या फसवणूकीचा बळी पडलेल्या विद्यार्थ्याला सरकारकडून दिलासा मिळत नाही.
६. इनटीए करत आहे अभ्यासक्रमातील बदलांची तयारी.
जेईई आणि एनईईटी सारख्या परीक्षांचे स्वरूप बदलण्याबाबत नेशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीई) ची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. याबद्दल उच्च स्तरावर बैठका पार पाडता आहेत. सीबीएसईने अभ्यासक्रमातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्रातील अनेक प्रकरण काढले. म्हणूनच एनटीई सीबीएसई अभ्यासक्रमाशी समन्वय साधण्यासाठी बदल करू शकते.
७. विद्यार्थ्यांसाठी “एकेडेमिक सपोर्ट प्रोग्राम”.
यूजीसीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी “एकेडेमिक सपोर्ट प्रोग्राम” योजना सुरू केली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये येणार्या कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी ही योजना आखली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.