Thursday, December 12, 2024
Homeकृषीयुरियाची कृत्रीम टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री; शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची पुुुरोगामी युवक...

युरियाची कृत्रीम टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री; शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची पुुुरोगामी युवक संघटनेची मागणी.

सांगोला (प्रतिनिधी) : युरियाची कृत्रीम टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री होत असल्याने ती त्वरित थांबविण्याची मागणी पुुुरोगामी युवक संघटनेने तहसीलदार व तालुका कृषी यांच्याकडे निवेदन निवेदनाद्वारे केली आहे.

संघटनेने म्हटले आहे की, सांगोला तालुक्यामध्ये सध्या शेतकऱ्यांना युरीया(खत) टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतकरी युरीया विकत घेण्यासाठी दुकानदाराकडे गेले असता ते युरीया शिल्लक नाही असे सांगतात व तोच युरीया कृत्रीम टंचाई भासवून शेतकऱ्यांना चढ्या भावाने विकला जातो. शेतकरी आधीच संकटात आहे व त्यातच युरीयासारख्या खताची टंचाई निर्माण करुन व चढ्या भावाने विक्री करुन शेतकऱ्याांची होणारी लुट थांबवावी.

संबंधित अधिकाऱ्यांनी युरिया टंचाईबाबत स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना टंचाई भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुका अध्यक्ष दिपक गोडसे, अँड.धनंजय मेटकरी, हनुमंत कोळवले, अक्षय बोत्रे, शंकर माने, पिंटु मुलाणी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय