Thursday, December 12, 2024
Homeकृषीकिसान सभेचा पुढाकार; देवळे गावात रोजगार हमीच्या कामास सुरुवात.

किसान सभेचा पुढाकार; देवळे गावात रोजगार हमीच्या कामास सुरुवात.

जुन्नर (प्रतिनिधी) : येथील देवळे गावात जुन्नर तालुका किसान सभेच्या पुढाकाराने आणि ग्रामपंचायत देवळेच्या सहकार्यातून रोजगार हमीच्या कामास १५ जुलै पासून ग्रामसेवक नांगरे भाऊसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली.

देवळे गावामध्ये रोजगार हमी (मनरेगा) च्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय किसान सभेच्या अथक प्रयत्नांतून तालुक्यातील अनेक गावात रोजगार हमीची कामे चालू झाली असल्याचे ‘महाराष्ट्र जनभूमी’शी किसान सभेचे तालुका कोषाध्यक्ष रोहिदास बोऱ्हाडे म्हणाले.

२००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात माकपच्या ६४ खासदारांच्या दबावामुळे २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा सरकारला संसदेत पारित करावा लागला. परंतु आज तागायात या योजनेची अंमलबजावणी म्हणावी तशी ग्रामीण भागात झाली नव्हती, असे बोऱ्हाडे म्हणाले.

सरकारची आणि प्रशासनाची उदासीनता असते. परंतु अखिल भारतीय किसान सभेमुळे पुणे जिल्हा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यात कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. मनरेगा या योजनेची लोकांना पुरेशी माहिती नसल्याने काम करण्याची इच्छा शक्ती, उदासीनता लोकांच्या मनात जाणवत होती, परंतु देवळे गावातील तरुण कार्यकत्यांच्या प्रयत्नांना यश आलं, असे बोऱ्हाडे म्हणाले.

कामाची पाहणी करून मजुरांना काम कसे करायचे आदीबाबत पंचायत समितीचे भोर यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी २० लोकं कामासाठी हजर होते. यावेळी ग्राम रोजगार सेवक सचिन घुटे, किसान सभेचे मंगेश बोऱ्हाडे, सागर बोऱ्हाडे, गणेश पोटे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय