Thursday, December 12, 2024
Homeग्रामीणजुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

जुन्नरच्या श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

              

(जुन्नर) :-  श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर मधील ३ विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल 2019 मध्ये घेतलेल्या एम. कॉम. च्या परीक्षेत   ‘ऍडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स’ या विषयात कु. दातखिळे माधुरी शिवाजी हिने विद्यापीठात सहावा क्रमांक, कु. भालेकर कविता शांताराम हिने अाठवा क्रमांक घोगरे जिजा रघुनाथ हिने नववा क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थिनी मध्यम वर्ग कुटुंबियातील असून हे यश प्राप्त केल्याने नागरिक कौतुक करत आहेत.

        या विद्यार्थीनींचे जुन्नर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष. अॅड. संजय शिवाजीराव काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही बी कुलकर्णी व उपप्राचार्य डॉ. डी. व्ही उजगरे यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थिनींना वाणिज्य विभाग व संशोधन केंद्राच्या प्रा. सारिका बनकर व प्रा. श्रद्धा रेणुकादास यांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय