Thursday, December 26, 2024
Homeराज्यRam Mandir : राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून आंदोलनाचा इशारा 

Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून आंदोलनाचा इशारा 

नागपूर :12 जानेवारी पासून आशा व गटप्रवर्तक राज्यभर त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, किमान वेतन द्या, तसेच आशा व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या निर्णयाचा अध्यादेश काढा, या मागणीकरता हे आंदोलन सुरू आहे.

तीन चार दशकांपासून आरोग्य अभियान राबवून बालमृत्यू, माता मृत्यू कमी केला, आणि इतरही आरोग्य विभागाशी संबंधित कामे तुटपुंज्या मानधनावर करत आहेत, परंतु आमच्या जगण्याचे काय? असा सवाल विचारात हजारो ‘आशां’नी हक्कासाठी संघर्ष सुरू केला आहे. 

याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढू असे आश्वासन देऊनही अद्याप अध्यादेश काढलेला नाही, याच्या निषेधार्थ 22 जानेवारी 2023 रोजी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहोळा दिनी राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक काळे वस्त्र परिधान करून सरकारचा निषेध करणार आहेत, अशी घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे (सी.आय टी.यू.) अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केली आहे.

याबबत साठे म्हणाले की, मंदिर निर्मितीला आमचा विरोध नाही. लाखो रुपये मंदिर बांधकाम करणाऱ्या केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत. राज्यातीलही शासन कामगार विरोधी असल्याने हे आंदोलन केले जाणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

1) आशा व सुपरवायजर यांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस द्या.

2) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करा.

3) आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.

4) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन द्या.

5) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करा.

6) सीएचओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी वैद्यकीय अधिकारीच्या स्वाक्षरीने द्यावा.

7) आशा सुपरवायझरला १,५०० रुपये महिना आरोग्य वर्धीनी निधी द्यावा.

8) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये. लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवावी, इतर वेळेस मॅसेज किंवा फोन करू नये.

9) डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रूपये रोज देण्यात यावा.

10) शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे १२ जानेवारीपासून आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर आहेत. वारंवार निवेदन व आंदोलन करूनही शासन मागणी पूर्ण करत नसल्याने शेवटी राममंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केली.

संबंधित लेख

लोकप्रिय