आझाद आझाद हिंद सेनेच्या पहिल्या महिला कँप्टन लक्ष्मी सहगल यांचा आज स्मृतीदिन.
कॅप्टन लक्ष्मी सहगल, पेशाने डाॅक्टर तेही अशा काळात ज्यावेळी स्त्री डाॅक्टर बघायला मिळणंही अवघड होते. पैसे कमावण्याची नामी आणि हुकूमी संधी, सिंगापूरमध्ये बाई तशा कामानिमित्तच गेल्या होत्या. पण युद्धबंदींच्या (१९४२ च्या दुसर्या महायुद्धातल्या) कैद्यांच्या सेवेला अक्षरशः जुंपून घेतले. देशाला स्वातंत्र्य करण्याच्या प्रेरणेने नेताजी सुभाषचंद्र बोस २ जुलै १९४३ साली सिंगापूरला गेले. त्यानंतर नेताजींच्या संपर्कात आल्या आणि सरळ आझाद हिंद सेनेतच भरती झाल्या. तिथेच न थांबत महिलांची मोठी बटालियनच त्यांनी स्थापन केली. तेथे त्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी एक महिला रेजीमेंट बनविण्याची घोषणा केली आणि राणी लक्ष्मीबाई रेजीमेंट स्थापन केली. त्यामध्ये लक्ष्मी सहगल कर्नल म्हणून सामिल झाल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना महिला बटालियनचा विशेष अभिमान होता.
साम्राज्यवाद्यांशी जगातले त्यांचे शत्रू हाताशी धरून दोन हात करून भारताय स्वातंत्र्य मिळवावे व ते महात्मा गांधीजींच्या चरणी अर्पण करावे या विचाराला समर्पित ही मंडळी होती. नेताजींच्या सैन्यात हिरीरीने भाग घेतलेल्या व आयुष्य समर्पित केलेल्या प्रमुख लोकामध्ये कॅप्टन लक्ष्मी हे नाव ठळक आहे. नंतर युद्धकैदी म्हणून त्यांना १९४६ मध्ये भारतास सोपवण्यास आले. व सरकारने नंतर त्यांची मुक्तता केली.
लक्ष्मी सहगल यांनी १९४७ मध्ये कर्नल प्रेमकुमार सहगल यांच्याशी विवाह केला. त्यानंतर ते कानपूर
येथे राहून मेडिकल प्रैक्टिस करू लागल्या. यावेळी सुध्दा त्या रूग्णांना तपासत होत्या. त्यांच्या आर्यनगर स्थित क्लिनिकमध्ये नेहमी रूग्णांची गर्दी असे.
बांग्लादेश फाळणीच्या वेळी जखमीवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांच्या मोहीमेत कॅप्टन लक्ष्मी आघाडीवर होत्या, तसेच भोपाळ गॅस दुर्घटनेवेळी सुध्दा त्या उपचारासाठी धावून गेल्या.
स्त्री दास्य मुक्तीसाठी त्यांनी भारतीय जनवादी महिला संघटनेची स्थापना केली, आजही भारतात महिलांच्या प्रश्नावर काम करणारी आघाडीची संघटना आहे.
१९७१ मध्ये लक्ष्मी सहगल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये सहभागी झाल्या. नेताजींच्या विचारांशी इमान बाळगून त्या आजन्म मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात कार्यरत राहिल्या. आणि सन २००२ साली डाव्या आघाडीच्या वतीने पूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विरोधात राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांची हार झाली.
त्यांच्या त्यागाचा वारसा कन्या सुभाषिनी अली चालवत आहेत. त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोच्या सदस्या आहेत. त्यांची एक मुलगी म्हणजे अनीसा पुरी होय.
कँप्टन लक्ष्मी सहगल यांना १९९८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिपक पाटील, जळगाव
८६६९४९१६६४