Thursday, December 12, 2024
Homeशिक्षण२४ जुलै : शिक्षण क्षेत्रातील ५ महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिक वर

२४ जुलै : शिक्षण क्षेत्रातील ५ महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिक वर

१. पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थीसाठी सुध्दा ऑनलाईन शिक्षण.

राज्यातील पहिली आणि दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ ३० मिनिटांसाठी ऑनलाइन शिकवले जाऊ शकते. सोमवारी ते शुक्रवार या कालावधीत केवळ ३० मिनिटे ऑनलाइन शिकवावे लागेल. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सुचनांबाबत शालेय शिक्षण विभागाने एक आदेश जारी केला आहे.

२. इयत्ता नववी आणि अकरावीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा पुन्हा होणार.

२०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातच राज्य मंडळाच्या वतीने नववी आणि अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सध्याच्या वर्षातच तोंडी परीक्षा घेतली जाईल. शासनाच्या निर्णयानुसार ९ वी व ११ वीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना ७ ऑगस्ट पर्यंत शाळेत बोलावून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सध्याच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून सुरू होणाऱ्या दहावी व बारावी च्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.

३. एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेनसह १२ वी असणे आवश्यक.

केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे की एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि सेंटर-एडेड संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचे नियम बदलण्यात आले आहेत.  ते म्हणाले की, सेंट्रल सीट एलोकेशन बोर्ड (सीएसएबी) ने निर्णय घेतला आहे की या संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन २०२० उत्तीर्ण उमेदवारांसाठी केवळ १२ वी इयत्तेचे पास प्रमाणपत्र आवश्यक असेल. यामध्ये त्यांचे गुण महत्वांचे नाहीत. पूर्वी बारावी मध्ये ७५% किंवा त्याहून अधिक गुण लागत होते किंवा मग मेन्स परिक्षेत पहिल्या २० विद्यार्थ्यां मध्ये स्थान मिळवणे आवश्यक होते.

४. जेएनयू मध्ये एम.फिल, एम.टेक शोधप्रबंध, पी.एच.डी. प्रबंध डिजिटल स्वरूपात देण्यास मान्यता.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एम.फिल, एम.टेक शोध प्रबंध, पीएचडी प्रबंध आता डिजिटल स्वरुपात सादर करता येणार आहेत. डिजिटल पेपर देणारे जेएनयू हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठ संशोधन संचालन करणारे प्राध्यापक देखील शोधनिबंधाचे डिजिटल स्वरूपात मूल्यांकन करतील.


५. विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्यास शिक्षक आघाडीचा विरोध.

राज्य शालेय शिक्षण विभागाने ७ ऑगस्टपर्यंत शाळेत किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याच्या या निर्णयाला भाजपा शिक्षक आघाडी यांनी विरोध दर्शविला आहे.

संकलन – अमित हटवार

संबंधित लेख

लोकप्रिय