Thursday, November 7, 2024
Homeजुन्नरजुन्नर शहरातील बेघर लोकांना 40 वर्षापासून घरकुल ची प्रतिक्षा 

जुन्नर शहरातील बेघर लोकांना 40 वर्षापासून घरकुल ची प्रतिक्षा 

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील जुन्नर नगरपालिका हद्दीतील बेघर लोकांना घरकुल मिळावे या साठी   R.P.Iरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची मातृभूमी बेघर आघाडी संघटना, प्रहार बेघर महीला संघटना व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप च्या वतीने जुन्नर नगर पालिका हद्दीतील  बेघर लोकांना घरकुल मिळावे या साठी मागील 40 वर्षापासून बेघर महिला घरकुल करीता आंदोलन, मोर्चा, उपोषण, आमरण उपोषण केले.

अनेक वेळा नगर पालिका, नगराध्यक्ष,  तहसील कार्यालय,  कलेक्टर ऑफिस, मंत्रालय, आमदार, खासदार यांची अनेक वेळा पत्र व्यवहार केले. समक्ष भेट घेऊन चर्चा केली, पण काहीही उपयोग झाला नाही. राजकिय नेते मतदानाच्या वेळी प्रत्येक वेळी  आश्वासने देत आहेत, तरी अजूनही बेघर लोकांना घरकुल मिळाले नाही या बाबत जुन्नर नगर पालिकेकडून दिनांक 11/12/24 नगर पालिका मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी R.P.I चे पोपट राक्षे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, प्रहार बेघर महीला संघटना चे व श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अरूण शेरकर अध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहरातील बेघरघरकुल बाबत जुन्नर नगरपालिका मध्ये प्रशासकीय अधिकारी संदिप भोळे मुख्याधिकारी यांची नगर पालिका मध्ये जावून भेट घेऊन चर्चा केली. 

यावेळी पंचलिग झोपडपट्टी, रोकडे मारूती  झोपडपट्टी व बेघर महीला ग्रूप यांनी मागील 40 वर्षापासून घरकुल करीता लढत असून घरकुल कधी मिळणार आहे, व म्हणून विचरणा केली व पंचलिग झोपडपट्टीत  पिण्याचे पाणी, रस्ते, लाईट, शौचालयाचे नळ दुरूस्ती व पाणी व कचरा या बाबतीत महीला व  नागरीक आक्रमक  झाले. यावेळी संभाजी साळवे यांनी घरकुल जागेच्या विविध प्रश्न उपस्थित केले   मुख्याधिकारी यांनी माहिती दिली.

तसेच प्रहार संघटना चे दिपक चव्हाण यांनी नगर पालिका कडून पत्र व्यवहार केल्यावर संघटनेला  नगर पालिका कडून कोणतीही पत्राचे उत्तर दिले जात  नाही, या कडे लक्ष वेधून घेतले. बेघर लोकांना घरकुल दयावे म्हणून जुन्नर शहरातील सर्व बेघर लवकर घरकुल दयावे व जुन्नर नगर पालिका हद्दीतील सर्व बेघर संघटना चे पदाधिकारी याची मिटिंग घेऊन घरकुल दयावे म्हणून मागणी केली.

यावेळी संदिप भोळे मुख्याधिकारी जुन्नर नगर पालिका यांनी सविस्तर माहिती दिली व झोपडपट्टीतील स्वच्छता, लाईट, पाणी, रस्ते या बद्दल सर्व संबंधित अधिकारी यांना बोलवून ताबडतोब सर्व सुविधा तातडीने दयावी म्हणून आदेश दिला व लवकरच  बेघर संघटना चे पदाधिकारी याची मिटिंग घेऊन घरकुल ची प्रश्न सोडवण्यात येतील. तसेच बेघर लोकांना घरकुल करीता बिल्डर, सर्व नॅशनल बॅंक चे मॅनेजर व पदाधिकारी यांची मिटिंग घेणात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पोपट राक्षे यांनी मुख्याधिकारी याचे व उपस्थित बेघर महीला व पदाधिकारी चे आभार मानले.

यावेळी R.P.I चे  संभाजी साळवे, पोपट राक्षे अध्यक्ष, सुरेश खरात उपाध्यक्ष, प्रवीण लोखंडे युवा अध्यक्ष , तारा वंजारी, सुमन वायकर, बेबी जाधव, प्रहार बेघर संघटना व श्री राधेश्याम चे दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष अरूण शेरकर अध्यक्ष, रजनी शहा उपाध्यक्षा, शमिम सय्यद  व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय