Friday, December 13, 2024
Homeआरोग्यकोरोना अपडेट:-जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली, वाचा सविस्तर

कोरोना अपडेट:-जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली, वाचा सविस्तर

बीड:- जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री  आलेल्या अहवालात आणखीन २५ पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

 यात बीड आणि गेवराई मध्ये प्रत्येकी ६ , परळी-१२ तर पाटोदा -१ अश्या रुग्णांचा समावेश आहे.

      या वाढलेल्या रुग्णांमुळे  आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४९ झाली आहे. दरम्यान, आता दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता या रूग्णांना ठेवण्यासाठी खाजगी शाळा मध्ये कोविड-१९ रूग्णालय उभारण्यात येणार आहेत.

       जिल्ह्यात मागील दहा दिवसात वेगाने रूग्ण संख्या वाढली आहे. १२० ठिकाणी जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी अनिश्चित कालावधी साठी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय