Thursday, November 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजनरल मोटर्स कंपनी मधील कामगारांच्या लढ्यास चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचा...

जनरल मोटर्स कंपनी मधील कामगारांच्या लढ्यास चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचा पाठिंबा

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : जनरल मोटर्स कंपनी मधील कामगारांनी आपल्या न्याय व हक्क व इतर मागण्यांसाठी दिनांक २/१०/२०२३ पासून  साखळी उपोषणाचा पर्याय निवडला आहे, अहिंसेच्या मार्गाने जनरल मोटर्स कंपनीचे कामगार जे उपोषणाला बसलेले आहेत. यामध्ये जनरल मोटर्सचे कामगार हे आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांमधे राहणारे आमच्या फेडरेशनचे सदस्य आहेत. हे सर्वजण आमच्या फेडरेशन परिवारातील आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. म्हणून आम्ही चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने सदर कामगारांच्या या साखळी उपोषणाला, या लढ्याला पाठिंबा देण्याबाबतचा ठराव मंजूर केलेला आहे. 

सदर साखळी उपोषणास आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत व वेळ आल्यास रस्त्यावरची लढाई जरी करण्याची वेळ आली तरी आम्ही चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन मधील सर्व सोसायट्यातील महिला सदस्यांसह इतर सर्व सभासद आपल्या बरोबरीने रस्त्यावर ऊतरू असा जाहीर पाठींबा चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड फेडरेशनच्या माध्यमातून देत आहोत, असे चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

ते आमच्या संस्थेचे सभासद आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील आमच्या गृहनिर्माण संस्थेतील बरेच सभासद जनरल मोटर्स कंपनीमध्ये काम करत आहेत. सदर कंपनीने या सर्व कामगारांना कामावरून कमी करून खूप मोठा अन्याय केलेला आहे. या सर्व कामगारांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची यामुळे उपासमार होत आहे. तरी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून या कामगारांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा या कामगारांचा जो आता लढा चालू आहे तो लढा आणखीन तीव्र केला जाईल आणि त्या लढ्यामध्ये आमचे फेडरेशन पूर्णपणे सक्रिय होईल.

  • संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन
संबंधित लेख

लोकप्रिय