अंतरवाली सराटी : उद्या 29 तारखेपासून प्रत्येक गावागावात आमरण उपोषण सुरू करा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं आहे. सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला, आम्ही 40 दिवस दिले. त्यांना 5 हजार पुरावे मिळाले, एक पुरावा असला तरी कायदा मंजूर होतो.
आमच्याकडून घेतलेला वेळ सुद्धा आमची फसवणूक करण्यासाठी होता, असं वाटत आहे,सरकारने माझ्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्यावी,मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.त्यांनी उपचाराला नकार देत सरकारसह मराठा समाजाला आवाहन केले आहे. सरकारने आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावे आणि आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करु नये, अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली.
सरकारवर दबाव निर्माण करू. प्रत्येक गावात आमरण उपोषण सुरू करा. आपल्या गावात, आपल्या दारात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचे नाही आणि मराठा समाजानेही राजकीय पक्षांच्या दारात जायचे नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.