Tuesday, January 14, 2025
Homeराज्यजनवादी महिला संघटनेने चारोटी - डहाणू राज्य महामार्ग अर्धा तास रोखला

जनवादी महिला संघटनेने चारोटी – डहाणू राज्य महामार्ग अर्धा तास रोखला

पालघर : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने आज चारोटी ते डहाणू राज्य महामार्ग अर्धा तास रोखून धरला.

केद्र सरकारच्या इशारावर हरियाणा आणि दिल्ली पोलिस अमानुष दडपशाही करत असल्याचा आरोप जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी केला.

दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनाच्या अमानवी वर्तनाचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव प्राची हातिवलेकर, राज्य उपाध्यक्ष लहानी दौडा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

लोकप्रिय