Wednesday, April 30, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : चिखली येथे स्वच्छता अभियान

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महानगर पालिका व जनवाणी संस्थेच्या माध्यमातुन स्वच्छता अभियान राबविण्यात येत आले. ” फ” क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत चिखली रोड येथे ‘स्वच्छता लीग’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात देश की मिट्टी और मेरा देश, स्वच्छतेची शपथ व परिसरात स्वच्छते विषयी विशेष अभियान राबविण्यात आले. Swachta Mission at Chikhli 

---Advertisement---

कचरा विलगीकरण करणा-या नागरिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अद्यापही काही नागरिक कचरा विलगीकरण संबंधी सूचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष कचरा विलगीकरण करण्याच्या मोहिमेत सक्रीय सहभाग घेत स्वतःच्या घरात विलगीकरण केलेला कचरा घंटा गाडीतच टाकताना वेगवेगळा द्यावा. ओला, सुका, घरगुती घातक, सॅनिटरी वेस्ट आणि प्लास्टिक अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावा. याबाबत घंटा गाडी सोबत असलेल्या आय ई सी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करावे.

---Advertisement---

तसेच घंटा गाडीवर वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावयाच्या कच-याचे नागरिकांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने तपशीलवार स्टिकर लावावेत, कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांची नोंद करून घ्यावी. सूचना देऊनही कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया गतिमान करावी असे मागणी सामाजीक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी यावेळी केले.

स्वच्छतेकडे वैयक्तिक कर्तव्य म्हणून न पाहता गरज म्हणून पाहिले पाहिजे.आरोग्यपूरक वातावरण निर्माण केले तरच आपण समाजाचा सन्मान केला असे होईल. यासाठी स्वच्छता दूतांसोबत महापालिका कर्मचाऱ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील स्वच्छता अभियान हा एक उत्सव झाला पाहिजे चला तर मग एक पाऊल स्वच्छतेकडे टाकून आपल्या देशाला समृद्ध करूया असे प्रतिपादन कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच अध्यक्ष व स्वच्छता दूत यशवंत कन्हेरे यांनी केले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles