Wednesday, December 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : फेरीवाला बोगस सर्वेक्षण रद्द करा – शहर फेरीवाला समितीची मागणी 

PCMC : फेरीवाला बोगस सर्वेक्षण रद्द करा – शहर फेरीवाला समितीची मागणी 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये करण्यात आलेले फेरीवाला सर्वेक्षण असत्य, बोगस, व जे व्यवसाय करत नाहीत अशांचे फोटो काढून, एकाच हातगाडीवर तिघांचे व्यवसायिक म्हणून फोटो काढून सर्व्हे केला असून खोटे व बेकायदेशीर असल्याने ते त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी आज शहर फेरीवाला समितीच्या मनपा सभागृहातील बैठकीदरम्यान केली. Cancel hawker bogus survey – demand of city hawker committee

यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खराटे, सहाय्यक आयुक्त प्रताप सरनाईक, सर्व क्षेत्रीय अधिकारी समिती सदस्य काशिनाथ नखाते, ज्ञानेश्वर मोरे,प्रल्हाद कांबळे, रफिक शेख, प्रवीण कांबळे, दामोदर मांजरे, एड बि के कांबळे, राजेंद्र वाकचौरे, संतोष जाधव, मनीषा राऊत, इरफान चौधरी, किरण साडेकर आदी उपस्थित होते.

सभागृहात आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने झालेल्या सर्वेक्षणचा आढावा सादर केला विक्रेत्यांची संख्या दाखवण्यात आली यावेळी नखाते म्हणाले की 19 हजार 697 पैकी 13 हजार 989 यांची संकेतस्थळावर नोंद 5 हजार 708 नोंदी नाहीत. अधिकारी कर्मचारी यात अनभिज्ञ आहेत सर्वेक्षण करणारा ठेकेदार हरकतींवर ठेकेदार सुनावणी कसा घेऊ शकतो ? बोगस झालेल्या सर्वेक्षणाच्या व तक्रारी सुनावणी सक्षम क्षत्रिय अधिकाऱ्याकडून होणे गरजेचे असताना शहर फेरीवाला समितीच्या सदस्यांना व संघटनांना विश्वासात न घेता सुनावणी झाली. 5000 पेक्षा अधिक तक्रारी व हरकती आल्या होत्या मात्र महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने फेरीवाल्यांची बाजू व अर्ज न स्वीकारता पटलावर घेतल्या नाहीत ठेकेदाराकडे पाठवून त्याच्या नोंदी गायब केल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्यांची नावे यादीत आहेत व 2015 मध्ये प्रमाणपत्र मिळालेले त्यांची नावे यादीत नाहीत हा मनपाचा अजब कारभार आहे. विक्रेत्यांची बोगस सर्वेक्षण केलेले रद्द करावे अशी सर्वांनी मागणी केली आहेे.

मात्र, सदस्य व संघटनेला बाजूला ठेवून पद्धतशीरपणे बोगस सर्वेक्षण केले जात असून आकडेवारी मध्ये प्रचंड तफावत असून सर्वेक्षणामध्ये एकंदरीतच सावळा गोंधळ निर्माण झालेला असल्यामुळे ते त्वरित रद्द करण्यात यावे व फेरीवाला हटाव व अतिक्रमण कारवाई त्वरित थांबवावी अशी सदस्या कडून एकमुखाने मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय