Friday, December 27, 2024
Homeराजकारणभारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर कोरोनाची चाचणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.  

त्यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे, माझी तब्बेत ठीक असून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये आहे. सर्व नियमांचे पालन करत आहे. 

तसेच, जे लोक गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी क्वारंटाईन व्हावे आणि आपली करोना तपासणी करून घ्यावी,’ असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. 

 

संबंधित लेख

लोकप्रिय