Friday, December 27, 2024
Homeकृषीकोल्हापूर : "टिचर्स विथ फार्मर्स " शिक्षक करणार कृषी व कामगार कायद्यांची...

कोल्हापूर : “टिचर्स विथ फार्मर्स ” शिक्षक करणार कृषी व कामगार कायद्यांची होळी

कोल्हापूर : जिल्ह्यातील शि‌क्षकांनी देशातील किसान आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे व त्यासाठी ‘टिचर्स विथ फार्मर्स जिल्हा कोल्हापूर’ अशी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने उद्या दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजता दसरा चौक येथील शाहू महाराज पुतळाजवळ किसान विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रमसंहिता कायदे यांची होळी करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. डॉ. डी. एन. पाटील, राजेश वरक, सुधाकर सावंत, डी. एम. गायकवाड यांनी केले आहे.

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा आणि सर्व शेतीमालाला एमएसपीची कायदेशीर हमी द्या, आदी मागण्यासाठी शेतकरी दिल्ली सभोवताली असलेल्या सर्व सिमावर प्रचंड धरणे आंदोलन करीत आहेत. आंदोलनास ५० दिवस झाले तरी शेतकरी पक्क्या निर्धाराने संघर्ष करीत असताना सरकार विचार करताना दिसत नाही.

केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या बरोबरीने कामगारांच्या न्याय्य हक्क व सुविधा संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने चार श्रमसंहिता मंजूर केलेल्या आहेत. त्या विरोधात केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आंदोलन सुरू केले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय